गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2017 (22:10 IST)

कर्जमाफीसाठी कृषिप्रधान राज्याच्या मुख्यमत्र्यांनी मागे का राहावे - उद्धव

कर्जमाफीची घोषणा म्हणजे फक्त निवडणूक जुमले नाहीत हे  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिले. उत्तर प्रदेशसारख्या देशातील सगळ्यात मोठ्या राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, तर मग कृषिप्रधान महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांनी मागे का राहावे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊन देशातील दबललेल्या, पिचलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.