रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2017 (09:02 IST)

देश मजबूत करण्यचं स्वप्न कधी बघणार? : उद्धव ठाकरें

पक्ष मजबूत करण्याचं स्वप्न बघताय, देश मजबूत करण्यचं स्वप्न कधी बघणार?, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. सोबतच उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे, तर महाराष्ट्रामध्ये निरुपयोगी सरकार आहे, असे म्हणत टीका केली आहे. शिवसेना आमदार, नगरसेवक आणि पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या सलग तीन दिवस मुंबईत बैठका सुरु आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.