गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

वेंकय्या नायडू बनले उपराष्ट्रपती

नवी दिल्ली- राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता वेंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपति पदाची शपथ दिलवली. पंतप्रधान मोदी यांनी वेंकय्या नायडू यांना शुभेच्छा दिल्या. या समारंभात माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनके नेते सामील झाले.

आंध्र प्रदेशमधून उपराष्‍ट्रपती झालेले नायडू हे तिसरे उपराष्‍ट्रपती आहेत. नायडू यांच्यापूर्वी डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन आणि व्ही. व्ही. गिरी हे आंध्र प्रदेशमधून उपराष्‍ट्रपती बनले होते. नायडू सलग दोन वेळा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. जुलै २००२ ते ऑक्‍टोंबर २००४ पर्यंत त्‍यांनी भाजपचे अध्यक्षपद सांभाळले होते. २००४ ला लोकसभा निवडणूकीत भाजपचा पराभव झाल्‍यानंतर नायडू यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला होता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये नायडू यांनी ग्राम विकास मंत्री पद सांभाळले होते. 

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्‍वाखालील सरकारमध्ये  ते नगरविकास खात्‍याचे मंत्री होते. त्‍यानंतर त्‍यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचाही कार्यभार सोपविण्यात आला होता.