बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

नऊ दिवस आदिशक्त्तीची आराधना करण्याचा हा सण!

पावसाळा संपत आलेला असतो, पीके तयार होत आलेली असतात. काही तयार झालेली असतात.बळीराजा खुशीत असतो.

घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. फेर धरुन पारंपारिक भोंडल्याची गाणी म्हणतात.

घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.