सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (17:03 IST)

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २२

श्रीगणेशायनमः ॥ जयदेवीनमस्तुभ्यंगिरिजेपावनेशुभें ॥ वाचंस्फूर्तिप्रदेस्मातपाहिमांमंदलसं ॥१॥
पुर्वाध्यायींनिरुपण ॥ मासानुरोधेंदेवीपुजन ॥ ऐकोनीतुष्टलेंऋषीगण ॥ पुन्हंपुसतीस्कंदातें ॥२॥
यात्राविधीसमग्राअतां ॥ षण्मुखासांगेहोसुव्रता ॥ मनींइच्छाधरुनीतत्त्वतां ॥ देवादर्शनाकारणें ॥३॥
जेस्वगृहापासोननिघाले ॥ मार्गक्रमीतचालले ॥ त्यांनींकायनियमधुरविभले ॥ जेणेंजगदंबासंतोष ॥४॥
ऋषीचाप्रश्नाइकोनभला ॥ स्कंदमनींसतोषला ॥ म्हणेचित्तद्यावोंचिमाझियबोला ॥ सर्वहीतुम्हासीसांगेन ॥५॥
शंकरेंकथिलेवरिष्टासीं ॥ तेंचीमिकथितोंतुम्हासी ॥ तीतरीशंकरोक्तिकैसी ॥ ऐकातुम्हीसादर ॥६॥
श्रीशंकरकॄपानिधी ॥ म्हणेवरिष्टामहाबुद्धी ॥ यत्रकर्तव्यताविधी ॥ श्रवणकरीसद्भावें ॥७॥
प्रथमकामनाउद्देशकरुन ॥ करावेंब्राह्मणसंतर्पण ॥ भावेंबह्क्तियुक्तहोऊन ॥ संकल्पकरावयात्रेचा ॥८॥
हेजगदंबिकेभवानी ॥ मीयेतोंतुझ्यादर्शनालागुनी ॥ निर्विघ्नपणेंसुरेशांनीं ॥ तुझेंदर्शनघडोमज ॥९॥
ऐसासंकल्पकरुन ॥ घरीजीप्रतिमादेवीएचीजाण ॥ तीशिविकेंतबैसवोन ॥ छत्रचामरसमवेत ॥१०॥
यष्टिध्वजजोदेवीचा ॥ तोअसावासवेचिसाचा ॥ वद्यदुंदुभीनादाचा ॥ शब्दघोषजयजकार ॥११॥
प्रातःस्नानकरोनीपुजन ॥ गीतनृत्यदेवीचिंतन ॥ हळुहळूमार्गीचालविंजाण ॥ मध्यान्हकालपर्यंत ॥१२॥
परमादरेंनियमधरावे ॥ ब्रह्मचार्यशुचिर्भुतअसावें ॥ दमनैंद्रियाचेंकरावें ॥ सत्यवचनइत्यादी ॥१३॥
भृमीशायीशुभाकृती ॥ सौम्यमुरासर्वाभुतीं ॥ द्वेषनिंदाउग्रप्रकृती ॥नधरावीसर्वथा ॥१४॥
दिवसयेतांचमाध्यान्ह ॥ शुचिनिर्भयपाहुनस्थान ॥ तेथेंनिवासायोजुन ॥ मध्यान्हस्नानकारावें ॥१५॥
करुनीसंख्याजपतर्प्न ॥ जगदंबेचेंकरुनीपुजन ॥ करुनीपंचमहायज्ञ ॥ मगभोजनकरावें ॥१६॥
सायंकाळींसंध्याकरुन ॥ धूपदीपादिदेवीसअर्पून ॥ करावेंस्तोत्रमंत्रपठण ॥ निद्राकरावीनेमस्त ॥१७॥
उषः कालीजागृतहोऊन ॥ शौच्याविधीमुखमार्जन ॥ मगकरोनियांस्नान ॥ प्राप्तःसंध्याकरावी ॥१८॥
करानीदेवीचेंपुजन ॥ मगमार्गस्थव्हावेंजाण ॥ त्रिकाळसंध्याएकस्थान ॥ ऐसियापरिजणावें ॥१९॥
आलस्यरहितनित्यनेमस्त ॥ मार्गक्रमोनीयमुनापर्वत ॥ प्राप्तहोयजेथेंगुणयुक्त ॥ जगदंबेचेंनिजगृह ॥२०॥
शिबिकारुढमुर्तीसुंदर ॥ यष्टिध्वजछत्रचामर ॥ वाद्यघोषजयजयकार ॥ अंतरींचिंतनदेवीचें ॥२१॥
ऐसीयासमारंभेंकरुन ॥ कल्लोलतीर्थपर्यंतगमन ॥ तेथेंशिबिकास्थीरकरुन ॥ साष्टांगनमनकरावें ॥२२॥
कल्लोलतीर्थीकरुनीस्नन ॥ धारातीर्थीस्नाकरुन ॥ जगदंबेचेंध्याबेदर्शन ॥ करावेंपुजनयथारुची ॥२३॥
सिद्धेश्वराचेंघेऊनदर्शन ॥ भैरवमांतगीभक्तवत्सलपूर्ण ॥ त्याचेंघेऊनदर्शन ॥ निवास्थानासमगजावें ॥२४॥
उपवासकरोनीतोदिनीं ॥ पुन्हांप्रबहतींदुसरेदिनी ॥ कल्लोळतीर्थीस्नानकरोनी ॥ पूर्वान्हीकर्ककरावें ॥२५॥
मगदेवीमंदिरांतयेऊन ॥ देवींचेंगरावेंमहापुजन ॥ पंचामृताचेंघालोनस्नान ॥ अभिषेककरावाशुद्धोदकें ॥२६॥
वस्त्रालंकारशुद्धचंदन ॥ केशरकुंकुमहरिद्रालेपन ॥ अक्षतापुष्पमाळाअर्पून ॥ धूपदीपनैवेद्यसमर्पावा ॥२७॥
सर्वोपचारसमर्पून ॥ जगदंबेचेंकरुनीपुजन ॥ करावेंब्राह्मणसंतर्पण ॥ देवीप्रीत्यर्थसंतोषें ॥२८॥
सुवासिनीकुमारिकाभोजन ॥ घालुनीतृप्तकरावेंजाण ॥ बंधुजनसहवर्तमान ॥ आपणभोजनकरावें ॥२९॥
रात्रींप्रदोषसमयींजाण ॥ नवसंख्यादीपिकाप्रज्वलून ॥ देवीसन्निधकरुन ॥ उत्साहकरावादेवीचा ॥३०॥
गीतवाद्येंगजरेंकरुन ॥ रात्रींगेल्यानंतरजाण ॥ प्रभातकाळींकरुनीस्नान ॥ देवीसान्नधमगयावें ॥३१॥
पुन्हांदेवीचेंकरोनीपुजन ॥ प्रार्थनाकरावीहाजोडून ॥ मगसंकल्पकरावाजाण ॥ अंतर्गृहयात्रेचा ॥३२॥
हेआदिशक्तिपरमेश्वरी ॥ तुझीअंतर्गृहयात्रासाचारी ॥ नियमपूर्वकरोनीबरी ॥ प्रसादेंतुझ्याजगदंबे ॥३३॥
रक्षणकरीसदामातें ॥ तुजशरणमीकृपवंते ॥ ऐसेंपार्थूनीजगन्ननीतें ॥ सांष्टांगनमनकरावें ॥३४॥
मगसिद्धेश्वरासीकरुनीनमन ॥ ब्रह्मकूपासन्निधजावेंजाण ॥ तेथेंकरोनियास्नान ॥ सुधाकुंडासीमगजावें ॥३५॥
सुधाकुंडीकरुनीस्नान ॥ करावेंदेवऋशीपितृर्पण ॥ मांतगकुडीकरोनीस्नान ॥ देवऋषीपितृतर्पणकरावें ॥३६॥
मातंगदेवीसीवंदनकरुन ॥ कल्लोळतीर्थासीजावेंजाण ॥ तेथेंप्रयत्‍नेकरोनीस्नान ॥ तर्पणकरावेंपूर्ववत ॥३७॥
तेथोनीजावेंधारातीर्थी ॥ स्नानतर्पणपूर्वरीतीं ॥ धारातीर्थींस्नानजेकरिती ॥ मोहभ्रांतीत्याचीचुके ॥३८॥
तेथोनीविष्णुतीर्थासीजावें ॥ विधियुक्तस्नानकरावें ॥ महाविष्णुसीपुजावें ॥ तेथुनीजावेंरामतीर्था ॥३९॥
रामकुंडीस्नानकरोन ॥ रामलक्ष्मणासीपुजावेंजाण ॥ मगरामवरदायिनीचेंपुजन ॥ करावेंपरमभक्तीनें ॥४०॥
मगपापनाशनतीर्थीजाऊन ॥ स्नानतर्पणपूर्ववतकरुन ॥ मगाऔदुंबरतीर्थीस्नानकरोन ॥ काळभैरवासीपुजावें ॥४१॥
मगनागधारातीर्थीस्नानकरोन ॥ टोळभैरवासीपुजन ॥ शुचिर्भुतधरोनीमौन्य ॥ घाटशिळेप्रतीजावें ॥४२॥
देवीपादुकासीकरुनवंदन ॥ मुद्गलतीर्थासीजाऊन ॥ तेथेंकरुनीस्नानतर्पण ॥ मुद्गलेश्वरासीपुजावें ॥४३॥
मगतेथुनीनिघावें ॥ नृसिंहतीर्थाप्रतीजावें ॥ स्नानतर्पनादिकरावें ॥ परमप्रीतिनेंतेधवां ॥४४॥
यावेंजगदंबेमदिरासी ॥ साष्टांगनमावेंजगज्जनीसी ॥ भक्तवत्सलातुरजादेवीसी ॥ निरांजनकरावे ॥४५॥
अंतर्गृह्यान्नापुर्ण ॥ करोनीकृतकृत्यहोयजाण ॥ शंकरम्हणेवरिष्ठालागुन ॥ केलेंकथनम्यातुज ॥४६॥
हेदेवीमहात्म्यउत्तम ॥ श्रद्धायुक्तजोनरोत्तम ॥ जितेंद्रियपवित्रपरम ॥ कथाऐकवीलश्रोतियांसी ॥४७॥
श्रोताहोऊनस्वस्थमानसा ॥ देवीसन्निधाऐकेलकथासुरस ॥ तरीश्रोतावक्तायाउभयतांस ॥ कॄपाकरीलजगदंबा ॥४८॥
त्यासीलक्ष्मीहोयप्राप्त ॥ तेणेंधर्मजोडेबहुत ॥ चित्तशुद्धिद्वारांत्वरीत ॥ ज्ञानहोयतयासी ॥४९॥
ज्ञानेंमोक्षहोयसुलभ ॥ ऐसापरंपरालभ ॥ देवीकृपेनेंत्यासीदुर्लभ ॥ कांहींचनसेत्रिभुवनीं ॥५०॥
हेदेवीमहात्म्य उत्तमपुर्ण ॥ भावेंकरितांश्रवनकीर्तन ॥ तेणेंनिष्पापहोऊन ॥ अपारपुण्यजोडतसे ॥५१॥
जोनरदेवीचाचिंतक ॥ भावेंपुजीलहेंपुस्तक ॥ तरीसप्तजन्माजिंतपातकं ॥ नाशपावतीत्क्षणीं ॥५२॥
जोनरवाचकदृढनिपुण ॥ देवीभक्तशांतसुलक्षण ॥ त्यासींहेंपुस्तकस्वतःलिहुन ॥ दानकरीलस्वस्थमनें ॥५३॥
जगदंबात्यासीप्रसन्नहोऊन ॥ अपारलक्ष्मीदेतसेजाण ॥ परोपकारीवेंचीधन ॥ ऐसेंऔदार्यदेतसे ॥५४॥
तोनरलोकींकीर्तिमान ॥ पुत्रवानसुखसंपन्न ॥ संग्रहीत्याच्याबहूगोधन ॥ विद्यावानहोतसे ॥५५॥
लक्ष्मीघरींस्थीरराहे ॥ कीतींदिंगतराजाये ॥ देवीपुजकनिःसीमहोय ॥ जगदंबेच्याप्रसादें ॥५६॥
हेंदेवीमहात्म्यउत्तमपूर्ण ॥ भक्तियुक्तकरावेंश्रवण ॥ समाप्तीसीब्राह्मणभोजन ॥ अनेकदानेंकरावीं ॥५७॥
तरीसर्वकामनाहोतीपूर्ण ॥ ऐसेंशंकरेवरिष्ठालागुन ॥ शिवपुत्रषडानन ॥ वर्णिताझालाऋषीसी ॥५८॥
पुन्हांशंकरवरिष्ठासी ॥ म्हणेत्वांएकग्रमानसीं ॥ अध्ययनकरीयाकथेसी ॥ तेणेंसर्वसिद्धिसीपावसील ॥५९॥
ऐसाशिववरिष्ठसंवादपूर्ण ॥ देशभाषेंतझालाकथन ॥ तेणेंवाचकश्रोतियाप्रसन्न ॥ निरंतरअसोजगदंबा ॥६०॥
पांडुरंगजनार्दन ॥ निमित्तकवितेसीकरुन ॥ अंतर्गृहयात्राकथन ॥ जगदंबेनेंसर्वकेलें ॥६१॥
पुढेंकथाकरावयाश्रवण ॥ सादरव्हावेंभाविकजन ॥ म्हणेपांडुरंगजनार्दन ॥ श्रवणकीर्तंनेंधन्यहोऊं ॥६२॥
इतिश्रीस्कंदपुराणेसह्याद्रीखंडे ॥ तुरजामाहत्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ द्वाविंशोध्यायः ॥२२॥
श्रीजंगदंबार्पाणमस्तु ॥ शुभंभवतु ॥