सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (14:28 IST)

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय १९

श्रीगणेशायनमः ॥ यस्याः कारुण्यलक्षेनवाग्विलासोविवर्द्धते ॥ पुंसाःसाभारतीरूपातुरजापातुमःसदा ॥१॥
शंकरकथानिरूपणा ॥ करितसेवरिष्टालागुन ॥ नवरात्रविधिकरुनकथन ॥ दशमीचेंविधान सांगतसे ॥२॥
उषःकालींदशमीदिवशीं ॥ उत्थापनकरावेंदेवीसी ॥ वेदपुराणमंत्रेंघोषीं ॥ शिबिकारुढकरावी ॥३॥
आधींकरूनीनिरांजन ॥ शिबिकारुढझालीयाजाण ॥ गीतवाद्यविचित्रनृतन ॥ लीलानेकप्रकारें ॥४॥
गायनकरावेंसुस्वर ॥ अनेकवाद्यांचागजर ॥ नटनृत्यर्कानृत्यविचित्र ॥ तालधरोनीकरावें ॥५॥
हावभावदावावेविशेष ॥ जेपाहतांमनासहोयसंतोष ॥ जयकारेंकरोनीघोष ॥ जगदंबेसीमिरवावें ॥६॥
श्वेतचामरेंविद्यमान ॥ श्वेतछत्रछायाकरुन ॥ पदोपदींनिरांजन ॥ पुष्पवृष्टीकरावीं ॥७॥
बाहेरपर्यतमृदुशयन ॥ निद्रस्थकरावीपांचदीन ॥ चतुर्दशीरात्रीसरल्याजाण ॥ बलीप्रदान करावें ॥८॥
ब्राह्मणक्षत्रेयवैश्यशुद्र ॥ हेमख्यवर्णचार ॥ याहुनसकरजातीइतर ॥ सर्वासपूज्यजगदंबा ॥९॥
जैसाज्यासअधिकार ॥ तैसाचत्यांनींपुजाविस्तार ॥ करावेंम्हणेसत्वर ॥ जगदंबाप्रसन्नहोतसे ॥१०॥
त्रिवणीवेदमंत्रअधिकार ॥ स्त्रीशुद्रद्विजमुखेंपुराणमंत्र ॥ संकरजातिज्याइतर ॥ अमंत्रपुजातयाशीं ॥११॥
सात्विकपूजाब्राह्मणासी ॥ रजतमयुक्तैतरासी ॥ म्हणोनिमद्यमांसयुक्तपुजेसी ॥ ब्राह्मणांनींकरुनये ॥१२॥
संशययेईलज्याचेमनीं ॥ मूळव्यासोक्तपाहवेंत्यांनीं ॥ उगाचभिमानधरोनी ॥ मीवोलतोंऐसेंनमानावें ॥१३॥
आतांऐकासावचित्त ॥ सर्वानींपुजायथाउचित ॥ अधिकारपरत्वेंपशुआहुत ॥ नानाभक्ष्यउपचारें ॥१४॥
पुष्पधूपदीपनैवेद्यअर्पण ॥ करूनीजगदंबेचेंपुजन ॥ स्तुतिस्तोत्रमंत्रपठण ॥ उत्थापनमंत्रेकरुनी ॥१५॥
॥ श्लोक ॥ उत्तिष्ठमार्जगतोहिताय ॥ संरक्षणायाखिलदेवशक्तये ॥ त्वद्युत्थितायजगदंबसर्वप्रकाशमानं भवतीत्रिलोकं ॥
टिका ॥ सर्वजगाच्याहितालागीं ॥ अंबेजागृतहोईवेगीं ॥ जगच्चक्रचालवितोअंगीं ॥ ऐसेंजेकांदेवगण ॥१६॥
त्यादेवगणाच्याशक्ति ॥ तुरंक्षणकरनीनिश्चिती ॥ स्वतंत्रसामर्थ्यकोनाप्रती ॥ तुजविणनसेइतरासी ॥१७॥
कोणीतपावेंयजनकारावें ॥ कोनींयथाकाळींवर्षावें ॥ कोणींऔषधीसीपुष्टकरावें ॥ कोणींफिरावेंसर्वत्र ॥१८॥
कोठेंअसेधारणशक्ति ॥ कोठेंअसेद्रवत्वशक्ति ॥ कोठेंविषयप्रकाशनशक्ति ॥ ऐशाअनेकशक्तिदेवाच्या ॥१९॥
त्यासर्वतुझ्यास्वाधीन ॥ तंचकरसीत्यांचेरक्षण ॥ यदर्थीबहुश्रुतिप्रमाण ॥ केनोपनिषतप्रसिद्ध ॥२०॥
जैसाजलाशयमहानएक ॥ अनेकपाठमार्गेत्याउदक ॥ अनेकक्षेत्रांसीजासदैख ॥ क्षेत्राकारदिसेंतेंउदक ॥२१॥
तैसीचिच्छक्तीतूंतरीएक ॥ कार्यकारणजगांतव्यापक ॥ उपाधीस्तवदिससीअनेक ॥ प्रकसेहंत्रिलोकैक्षणेंतुझ्या ॥२२॥
अंबेजागृतहोऊन ॥ सर्वांचेकरीरक्षण ॥ मंत्रस्तुतीनेंजागृकरून ॥ सिंव्हासनीबैसवावी ॥२३॥
उषःकालींपौर्णिमेसी ॥ पूजोनियांजगंदबेसी ॥ बलिदानदेऊनमहापुजेसी ॥ पुन्हांकरावेंविस्तारें ॥२४॥
ऐसेंपुजावेंपौर्णिमेसी ॥ पुन्हांआश्विनकृष्णाष्टमीसी ॥ पंचामृतस्नानघालेनीदीसी ॥ वस्त्रालंकारसमर्पावें ॥२५॥
अष्टमीच्यारात्रींसी ॥ पुजांवेंनऊकुमारींसी ॥ वस्त्रकंचुकीभूषणासी ॥ देवोनीधूपदीप समर्पावें ॥२६॥
पक्कान्नभोजनघालुन ॥ तांबुलदक्षणादेऊन ॥ प्रदक्षणादिउपचारेंपुजुन ॥ नमस्कारकरावा ॥२७॥
आश्विनकृष्णचतुर्दशी ॥ पूर्ववतपुजावेंअंबिकेसी ॥ ऐसेंपूजनआश्विनमासी ॥ करीत्यांचेफलऐका ॥२८॥
भौमांतरिक्षदिव्यजाण ॥ उत्पातत्रिविधदारूण ॥ नाशपावतीनलगतांक्षण ॥ सूर्योदयींतमजैसी ॥२९॥
इतिम्हणजेटोळाचेंभय ॥ तेवीमहामारीचेंभय ॥ कृत्याम्हणजेव्याभिचारभय ॥ मुठचेडिइत्यादि ॥३०॥
तेसर्वहीपावतीनाश ॥ निःसंशयधारिजेविश्वास ॥ राजभयचोरभयव्याघ्रादिभयास ॥ नाशहोईलसत्यहें ॥३१॥
व्याधिपीडासर्पादिभय ॥ नाशपावतीनिःसंशय ॥ देवीपुजनमात्रेंनिर्भय ॥ तात्काळहोतसेसत्यहें ॥३२॥
प्राप्तहोयबहुसंपत्ती ॥ पुत्रपौत्रबहुसंतती ॥ अष्टमहासिद्धिघरांयेती ॥ अणिमामाहिमागरिमादि ॥३३॥
लघीमाप्राप्तीप्रकाम्यता ॥ इशिताआणिवशिता ॥ ऐशाअष्टसिद्धितत्वतां ॥ देवीपुजकाघरींराहती ॥३४॥
पद्मशंखादिनवनिधी ॥ पुरुषार्थधर्मार्थकमादी ॥ देवीप्रसादेंनिरवधी ॥ प्राप्तहोयपुजकासी ॥३५॥
अंतींमोक्षासीझडकरी ॥ प्राप्तहोतसेसपरिवारीं ॥ आरोग्यहोयशरीरीं ॥ होतीइंद्रियेंषटतर ॥३६॥
इतरपशुआणिगाई ॥ बहुराततीत्याच्यासंग्रहीं ॥ त्रिलोकींधन्यतोचिपाही ॥ त्यासमकोणीदुजानसे ॥३७॥
त्याचीसेवाएवइच्छिती ॥ त्यापुढेंराजेमानवाकविती ॥ पादांकितसर्वहीहोती ॥ जगदंबेच्याकॄपेनें ॥३८॥
आश्विनमासपुजाविधान ॥ हेंतुजसर्वकेलेंकेंथन ॥ शंकरम्हणेऋषीलागुन ॥ कार्तिकाचेंऐकाआतां ॥३९॥
कृत्तिकानक्षत्रिशिवयोगयुक्त ॥ कार्तिकपौर्णिमाझालियाप्राप्त ॥ विशेषपर्वकाळनिश्चित ॥ जगदंबेच्यापूजेसी ॥४०॥
प्रतिवर्शीकार्तिकपौर्णिमेसी ॥ भावेंपुजावेंजगदंबेसी ॥ पूजाद्रव्यमेळवुनीप्रयत्‍नेसी ॥ भक्तितत्परहोऊनी ॥४१॥
समर्पावेंसर्वउपचार ॥ नानाविधपुष्पाचेंहार ॥ अपूपपकान्नसुंदर ॥ नैवेद्यअर्पण करावा ॥४२॥
आधींप्रदक्षणाघालून ॥ करावेंसाष्टांगनमन ॥ कृष्णाष्टमीसीदध्योदन ॥ नैवेद्यकरोनीपुजावें ॥४३॥
मार्गशीर्षमासझालियाप्राप्त ॥ अष्टमीसीपुजावेंदेवीप्रत ॥ देवीच्याउत्तर भागींस्थित ॥ श्रीमल्लरीदेवीजो ॥४४॥
त्यासीपुजावेंषष्ठीदिवशीं ॥ चंपाषष्ठीम्हणतीज्यातिथीसी ॥ शिवावतारमल्लारिसी ॥ सभ्दावेंसीपूजावें ॥४५॥
धत्तुरपुष्पेंबिल्वपत्रेंकरून ॥ शुभ्रअक्षताचंदन ॥ धूपदीपसमर्पून ॥ नारीकेलाफळअर्पावें ॥४६॥
नानाभक्ष्यनैवेद्यअर्पून ॥ ब्राह्मणासीद्यावेंवायन ॥ यथारुचीघालावेंभोजन ॥ श्रीमल्लारिप्रीत्यर्थ ॥४७॥
इतरवर्णजेभक्तजन ॥ त्यांनींव्यंजकयुक्तपलांडचूर्ण ॥ नानाभक्षपदार्थकरून ॥ भोजनद्यावेंइतरांसी ॥४८॥
निषिद्धपदार्थयुक्तअन्न ॥ ब्राह्मणेंअपूर्णयेदेवालागुन ॥ स्वतःनभक्षावेंजाण ॥ देऊनयेब्राह्मणांसी ॥४९॥
धर्मस्थापावयासाचार ॥ ईश्वराचाअसेअवतार ॥ तेथेंकरितांअनाचार ॥ ईश्वरक्षोभहोईल ॥५०॥
व्यासोक्तमल्लारीमहात्म्यपाहतां ॥ त्यांतपायसनैवेद्यवर्णिलातत्त्वतां ॥ भरीतरोटीपलांडूचीवार्ता ॥ वर्णिलीनहींकिंचित ॥५१॥
सात्वीकपूजासात्विक उपचार ॥ देवासीहोतसोप्रियकर ॥ स्वर्धमनिष्ठजोनर ॥ तोचिआवडेदेवासी ॥५२॥
स्वधर्मनिष्ठाभक्तिशुद्ध ॥ जैसेंसोनेंआणिसुंगध ॥ इतरवेडेचारअबद्ध ॥ अंधपरंपराजाणावीं ॥५३॥
असोक्षमाकरोनश्रोतीं ॥ पुढेंकथाऐकानिगुती ॥ विधीयुक्तपुजोनीहाळसापती ॥ द्विजसंतर्पणकरावें ॥५४॥
गीतवादवेदघोष ॥ नृत्यतालभावविशेष ॥ जेणेंशिवासीहोयसंतोष ॥ तेभक्तीपूर्वककरावें ॥५५॥
ऐसेंमल्लरीचेंपुजन ॥ जेनरकरितीतयासीजाण ॥ पुण्यफळहोयतेंहीकथन ॥ सांगेनश्रवणतूंकरी ॥५६॥
यालोकींसंततीयुक्त ॥ नानाभोगसमन्वित ॥ अंतीउत्तमकैलासप्राप्त ॥ देवादिकांदुर्लभजी ॥५७॥
भल्लारीपुजाझालीयाजाण ॥ जगदंबेचेंकरावेंअर्चन ॥ नवरात्रपद्धतीप्रमाणेंजाण ॥ परमेश्वरीसीपुजावें ॥५८॥
पुढेंचतुर्दशीचेनिशीं ॥ नूतननवसंख्यादीपिकंसी ॥ प्रज्वलितकरोनीवाद्यघोषसी ॥ गीतनृत्यकरावें ॥५९॥
रात्रींजागरोत्सवकरुन ॥ उषःकालीपौर्णिमेसीजाण ॥ कल्लोळतीर्थीकरुनस्नान ॥ धारातीर्थीस्नानकरावें ॥६०॥
जगदंबेसीपुजावेंयथेचित ॥ त्यासीलक्ष्मीहोतसेप्राप्त ॥ धर्मार्थचिंतिलेमनोरथपूर्ण ॥ होतीलतत्काळ ॥६१॥
ऐसेंशंकरकेलेंकथन ॥ येथेंअध्यायझालापूर्ण ॥ विनवीपांडुरंगजनार्दन ॥ पुढेंकथाऐकावया ॥६२॥
इतिश्रीस्कंदपुराणेसह्याद्रीखंडे ॥ तुरजामहात्म्येशंकरवरिष्टसंवादे ॥ ऐकोनविंशाध्यायः ॥१९॥
श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभभंवतु ॥