शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|

भाजपचा मंदिराला 'राम राम'

'मंदिर वहीं बनाऐंगे' चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर आता भाजप राम मंदिरालाच 'राम राम' करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

प्रत्येक निवडणुकीत मंदिराचा मुद्दा उचललाच पाहिजे असे सक्तीचे नसल्याचे मत भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.
प्रसाद यांच्या या वक्तव्यावर अनेक हिंदुत्ववादी संस्था आणि संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नागपूर येथील बैठकीच्या उद्घाटन समारंभात आपल्या भाषणात राजनाथ यांनी मंदिराबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट न केल्याने बैठकीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनाही बुचकळ्यात टाकले आहे.

राम मंदिराची निर्मिती करण्याचे पक्षाचे स्वप्न असले तरी प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा नसल्याचेही ते म्हणाले.