1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (08:25 IST)

ललित पाटीलवर होणार ‘मोक्का’अंतर्गत कारवाई?

lalit patil
पुणे : ड्रग्जमाफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी नुकतेच चेन्नई येथून अटक केली आहे. यानंतर आता ससून रुग्णालयातून पळून जाणं आणि यासाठी त्याला कोणी मदत केली याच्या तपासासाठी पुणे पोलिस देखील ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. पुणे पोलिस त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
 
२ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हाती तुरी देऊन पळून गेल्याप्रकरणी पुणे पोलिस ललित पाटीलची कस्टडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाटील याच्यावर ड्रग्ज रॅकेट चालवण्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल आहेत.
 
पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबई पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर ललित पाटीलवर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मोक्का लावण्याच्या हालचाली पुणे पोलिसांनी सुरू केल्या आहेत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor