शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (18:36 IST)

Pune Metro पुणे मेट्रो प्रकल्पाचा खर्च 2 हजार कोटींनी वाढला

pune metro
पुणे  : ‘‘मेट्रो स्टेशनच्या जागेत करावे लागलेले बदल, कोरोनामुळे झालेला विलंब आणि भूसंपादनाचा वाढलेला खर्च यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात जवळपास दोन हजार कोटी रुपयांनी वाढ झाली आहे’’, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, महामेट्रोने हाती घेतलेले दोन्ही मेट्रोमार्ग मार्च 2024 पर्यंत पूर्ण होतील, असा दावाही त्यांनी केला.
 
पुणे शहर व परिसरात पायाभूत सुविधांची कामे गतीने सुरू आहेत. त्यामुळे पुणे शहर हे देशासाठी विकासाचे मॉडेल ठरणार आहे, असा विश्‍वास मुरलीधरन यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘पुणे शहरात वनाज ते रामवाडी मेट्रो प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्वारगेट येथील मेट्रो स्टेशनचे काम पूर्णत्वास आले आहे.