रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (00:26 IST)

जिल्हा न्यायालयाकडून अ‍ॅड. सागर ऊर्फ राजाभाऊ सुर्यवंशी फरार घोषित

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयासमोर (High Court) हजर न होता अटकेपासून पळ काढणाऱ्या अ‍ॅड. सागर मारुती ऊर्फ राजाभाऊ सूर्यवंशी (Avt. Sagar Maruti alias Rajabhau Suryavanshi) यांना न्यायालयाने फरार (absconded) घोषित केले आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. एच. साळुंखे (Additional District Judge S. H. Salunkhe) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सूर्यवंशी यांच्याविरुद्ध पुणे आणि पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. सीआयडीसह (crime investigation department) पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस त्याला कधी अटक (Pune Crime) करणार याकडे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी यांच्यासह त्याची पत्नी शीतल तेजवानी (sheetal tejwani), अ‍ॅड.. प्रियांका दिलीप शेलार (Adv. Priyanka Dilip Shelar), अ‍ॅड. निवृत्ती मुक्ताजी पानसरे (Nivrutti Muktaji Pansare) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेजवानी हीला अटकपूर्व जामीन मिळालेला असून शेलार व पानसरे जामीनावर आहेत. याप्रकरणी रोझरी एज्युकेशन ग्रुपचे भागीदार विनय विवेक आरान्हा (vinay vivek aranha partner of Rosary Education Group) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली होती. सूर्यवंशी याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने न्यायालयात आत्मसमर्पण करण्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते. मात्र, तो हजर झाला नाही. त्यामुळे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट (non bailable warrant) जारी केले.
 
या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलिसांकडून सीआयडीकडे (CID) वर्ग करण्यात आला होता.
सूर्यवंशी हा अटक टाळण्याकरिता विविध युक्त्यांचा वापर करीत आहे.
त्यामुळे तपासात अडथळे येत आहेत. अजामिनपात्र वॉरंटअंतर्गत कारवाई करण्यासाठी सीआयडीने दोन विशेष भरारी पथके नेमली असून त्यामध्ये 4 अधिकारी आणि 6 पोलीस देण्यात आले आहेत.
त्याचा कोरेगाव पार्क, पिंपरी चिंचवड, शिवाजीनगर न्यायालय येथील कोर्टरूम व परिसर आदी ठिकाणी शोध घेऊनही तो सापडत नाही.
नातेवाईक, त्याच्या वापरातील वाहने यावर पाळत ठेवण्यात आली आहे.
यासोबतच त्याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला जात आहे.
तरीदेखील तो सापडत नसल्याने सीआयडीने त्याला फरार घोषित करण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे.
 
रोझरी एज्युकेशन ग्रुपच्या (rosary education society) या शैक्षणिक संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणुन अ‍ॅड सागर सूर्यवंशी हा सन 2010 पासुन काम पाहत होता.
सुर्यवंशीची पत्नी शितल तेजवानी हिच्यासोबत फिर्यादी यांचे व्यवहारासंबंधी  करार (फॅसिलिटी अ‍ॅग्रीमेंट) झाले होते. फिर्यादी आणि आरोपीमध्ये एका जमिनीचे व्यवहारवरून मतभेद झाले.
त्यानंतर हा करार फिर्यादी आरान्हा यांनी रद्द केला.
याप्रकरणात तेजवानी यांनी शिवाजीनगर न्यायालयात दावा दाखल केला.
आरान्हा यांचे खोटे प्रतिज्ञापत्र तयार करुन, त्यावर फिर्यादी व त्यांचे वडील विवेक आरान्हा यांच्या
खोटया सहया करुन ते खोटे प्रतिज्ञापत्र अ‍ॅड. पानसरे (Nivrutti Muktaji Pansare)
यांच्यामार्फत नोटरी करुन घेतले.
तसेच सूर्यवंशी याने अ‍ॅड प्रियंका शेलार हिने फिर्यादी यांचे वकीलपत्र घेतल्याचे न्यायालयास भासवले.
ते प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करुन न्यायालयाची दिशाभुल करुन फिर्यादी यांची फसवणुक केली.