रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (11:40 IST)

पुण्यात तरुण डॉक्टरचा ड्रायविंगसीट वर हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू

death
काळ कधी आणि कुठे झडप घालेल हे कोणीही सांगू शकत नाही. पुण्याच्या वानवडी येथे चारचाकी मध्ये ड्रायविंग साठी सीटवर असताना एका तरुण डॉक्टरला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. 

सदर घटना गुरुवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास परमार पार्क सोसायटीच्या समोर उभी असलेली एक कार चालू अवस्थेत आढळून आली. गाडी सुरु अवस्थेत का आहे कोणी गाडीत आहे की  नाही हे बघायला काही जणांनी जवळ जाऊन बघितले तर त्यांना एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत दिसला.

त्यांनी ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनुप रॉय असे या मयत व्यक्तीचे नाव असून ते डॉक्टर होते. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. असे त्यांच्या पत्नीने सांगितले. 

मयत रॉय कामठे पाटील नगर, येवलेवाडीत एका सोसायटीत राहत होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या अपघातामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 
Edited by - Priya Dixit