आत्महत्या नव्हे; पळून जाताना पडल्यामुळे दीप्ती काळेचा मृत्यू
पुणे शहरातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक बळवंत मराठे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आलेल अॅंड. दीप्ती काळे यांनी ससून रुग्णालाच्या आठव्या मजलवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र, या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीप्ती यांनी आत्महत्या नव्हे तर ससून रुग्णालयाच्या बाथरूममधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना आठव्या मजलवरून खाली पडल्यामुळे गंभीर दुखापतहोऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसात नोंद करण्यात आली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे 42 वर्षीय दीप्ती यांनी ससून रुग्णालाच्या इमारतीतून उडी घेत आत्महत्या केली, असे वृत्त आधी समोर आले होते. परंतु पळून जाताना पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
सराफ व्यवसायिक मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीप्ती आणि निलेश शेलार यांना पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी अटक केली होती.