शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (11:15 IST)

ओव्हरटेक करणे बाइकस्वाराला महागात पडले

Pune Maval Accident :तरुणांमध्ये वाहनचालवताना स्टंट करण्याचा नाद असतो. या नादात  ते वाहनचालवताना शिस्त पळत नाही. अशामुळे  ते अपघाताला बळी पडतात. पुण्यात एका बाइकस्वाराला ओव्हरटेक करणे महागात पडले. हा चित्तथरारक अपघात कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 
 
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगांव - चाकण रोड वर हिरोहोंडा बाईकवरुन बाळू शिळवणे हा तरुण जात होता. तो एका कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता. रस्त्याच्या पूर्णपणे बाजूला आलेली त्याची बाईक तो पुन्हा ओव्हरटेक करुन डाव्या लेनमध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता. पण इतक्यात समोरुन येणाऱ्या कारच्या वेगाचा त्याला अंदाज आला नाही. डाव्या लेनमध्ये बाईक आणण्याच्या आधीच समोरुन येणाऱ्या कारच्या उजव्या बाजूला त्याच्या बाईकचा धक्का लागतो आणि दुचाकीस्वार बाळू शिळवणे हा तरुण जागीच कोसळतो. कंटेनरच्या खाली येतो की  काय अशी धडकी ज्याने हे अपघात पहिले त्याच्या मनात भरली.पण नशीब बलवत्तर म्हणून हा सुदैवाने थोडक्यात बचावला.
कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ कैद झाला आहे. 
बाळू या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा वर गुन्हा दाखल केला आहे.