रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शनिवार, 26 मार्च 2022 (10:07 IST)

पुणे : येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील येरवडा कारागृहातील एका कैद्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गणेश जगन्नाथ तांबे (५३) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. आरोपीच्या आत्महत्या करण्याच्या मागील कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी गणेश जगन्नाथ तांबे हा येरवडा कारागृहात २०१० च्या खुनाच्या गुन्ह्यात खुल्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगत होता. गुरुवारी दुपारी बराक क्रमांक दोन येथील स्वयंपाकचे काम झाल्यावर, तिथे काही वेळाने गणेश जगताप याने गळफास लावून घेतला.या घटनेची माहिती मिळताच,डॉक्टरांनी तपासणी केली असता,डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर आरोपीच्या आत्महत्या करण्याच्या मागील कारण अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले.