1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जुलै 2021 (16:01 IST)

बैल मुततो तशा भूमिका बदलत नाही – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. भाजपसोबत मनसेची युती होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला.
 
‘भूमिका क्लिअर काय करायच्या. माझ्या भूमिका क्लिअर आहेत. माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार नाही करत. बैल उभ्या उभ्या चालता चालता मुततो. तसा विचार करत नाही मी. माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत. त्या देश हिताच्या आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. त्यात प्रत्येक राज्यांनी आपली भूमिका कशी निभावली पाहिजेत.
 
माझा भूमिकांना विरोध असतो. व्यक्तीला नाही. हे मी अनेकदा स्पष्ट केलं आहे. मोदी असतील किंवा अमित शहा असेल यांच्याशी माझं वैयक्तिक देणघेणं नाही. ज्या भूमिका पटल्या नाहीत त्याला विरोध केला आणि ज्या पटल्या त्याचं जाहीर अभिनंदनही केलं आहे. त्याचं समर्थनही केलं. त्या समर्थनासाठी मोर्चाही काढला आहे. जे पटत नाही ते पटत नाही सांगणं महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टीसाठी छक्केपंजे करू का?, असंही ते म्हणाले.
 
जो टारगट त्याला टार्गेट करणार
महापालिका निवडणुकीत तुम्ही कुणाला टार्गेट करणार असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी जो टारगट असेल त्याच्यावर टार्गेट करणार, असं उत्तर राज यांनी दिलं.