रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (10:44 IST)

शिरूर राष्ट्रवादीच्या आमदारांना जीवे मारण्याची धमकी, आमदार अशोक पवार यांना पोलीस संरक्षणाची मागणी

फोटो साभार -सोशल मीडिया 
पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार (Ncp Ashok Pawar) यांना एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे जिल्ह्यात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत मोर्चा काढून निनावी पत्राद्वारे धमकी देणाऱ्या ताबडतोब शोधून अटक करावे आणि आमदार अशोक पवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी शिरूर पोलीस ठाण्यात केली आहे. 
 
शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र काळे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील काही लोकांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या मध्ये अजित पवार आणि त्यांच्या पत्नी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य सुजाता पवार यांची बदनामी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या साठी आमदार पवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
या पत्रामध्ये काही नगर सेवक आणि  इतर लोकांची बदनामी करण्यात आली आहे. या पत्रामुळे  शिरूर मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून निनावी पत्र पाठविणाऱ्याला शोधून अटक करण्याची मागणी केली आहे.