शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (17:26 IST)

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत सुरु

traffic
मुंबई-बंगलोर महामार्गावरील बावधन परिसरात असलेला चांदणी चौकातील पूल अखेर शनिवारी मध्यरात्री पाडण्यात आला. मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी 600 स्फोटकांद्वारे या ठिकाणी मोठा स्फोट करून पूल पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या स्फोटानेही संपूर्ण पूल पडला नाही त्यानंतर जेसीबी मशीन पोकलेन मशीनच्या सहाय्याने मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास संपूर्ण पूल जमीनदोस्त करण्यात आला.
रात्री अकरा वाजता चांगली चौकातून जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. 

सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा होती तसे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होत. मात्र वाहतूक सुरू करण्यासाठी काहीसा वेळ लागला. सकाळी साडेदहा नंतर या ठिकाणचा संपूर्ण राडाराडा हटवण्यात आला असून आता वाहतुकीसाठी मुंबई बंगलोर महामार्ग अखेर खुला करण्यात आला.
 
चांदणी चौकातील हा पूल 1992 साली बांधण्यात आला होता. या पुलासाठी वापरलेल्या स्टीलचे प्रमाण अधिक असल्याचे रात्रीच्या स्फोटात पुल फक्त खिळखिळा झाला. पुलाचे बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात स्टिल व दगड वापरण्यात आले होते. जरी पुल कमकुवत झाला़ तरी पिलर पडले नाही.वाहतूक कोंडीमुळे हा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

Edited By - Priya Dixit