रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (17:58 IST)

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणूक होणार ; निवडणुकीत भाजप शिवसेनेत चुरस

bjp shivsena
राज्यसभेच्या सहा जागेवर होणाऱ्या निवडणुकेला बिनविरोध करण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न अपयशी झाल्यावर राज्यसभेसाठी निवडणूक होण्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत चुरस लागली आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी विरोधी पक्षेचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या वेळी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.

भाजपराज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार कायम ठेवण्याच्या निर्णयावर ठाम आहे. तर शिवसेना आपला दुसरा उमेदवार कायम ठेवण्याच्या मतावर ठाम आहे. 
 
भाजपने राज्यसभा निवडणुकीला बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड म्हणून भाजपला विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी कडून पाचवी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.