1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , बुधवार, 30 जुलै 2014 (11:27 IST)

कॉंग्रेसने राष्ट्रवादीची मागणी पुन्हा फेटाळली

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा हव्या आहेत. परंतु काँग्रेसला ते मान्य नाही. कॉंग्रेसने राष्ट्रवादीची मागणी पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे. यंदाच्या निवडणुकीत केवळ जागांची अदलाबदल होऊ शकते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. 
 
राज्यात जागा वाटपावरून रान पेटले असताना दिल्लीत केंद्रीय नेत्यांनी राष्ट्रवादीच्या सूचनांचे स्वागत केले आहे. मात्र,  समाजवादी पार्टीतून राष्ट्रवादीमध्ये आलेले नवापूरचे विद्यमान आमदार शरद गावित यांच्यासाठी ती जागा सोडण्यासही माणिकरावांनी स्पष्ट नकार दिला आहे.
 
दरम्यान, महायुतीत विधानसभा निवडणुकासंबंधी जागा वाटपाच्या चर्चा सुरु असतानाच, महायुतीची सत्ता आल्यास सत्तेत 15 टक्के भागीदारी आणि राज्य विधान परिषदेच्या चार जागा आपल्या पक्षाला मिळण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी केली आहे.