1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: दिल्ली , सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (10:48 IST)

थंडीत होणार ‘गर्मी का एहसास’?

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक बदलाचे वादळ

संसदेच्या आजपासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक बदलाचे वादळ घोंघावणार आहे. हे वादळ देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात असले तरी विरोधकांकडून याला टोकाचा विरोध होण्याची शक्यता असल्याने मोदी सरकारच्या या दुसर्‍या अधिवेशनामध्ये दिल्लीतील थंडीत ‘गर्मी का एहसास’ होण्याची शक्यता आहे.
 
अधिवेशनास आज सोमवारपासून प्रारंभ होत आहे. आर्थिक अजेंडा मांडत  परदेशी गुंतवणूकीला परवानगी देणारे विमा विधेयक त्याचबरोबर जीएसटी हे कर विधेयक सादर करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.
 
कोळसा ठराव विधेयकाची जागा घेणारे विधेयक सादर करण्यालाही सरकारचे प्राधान्य असणार आहे. संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल आणि समाजवादी पक्षाने या विधेयकांबाबत समान भूमिका घेण्याचे ठरविले आहे.