1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Updated :मुंबई , मंगळवार, 17 जून 2014 (11:00 IST)

दहावीचा निकाल आज

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेतलेल्या शालांत म्हणजेच दहावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्‍यात आली आहे. आज मंगळवारी(17 जून) निकाल जाहीर केला जाणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी माहिती दिली. वेबसाईटवरून दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मंगळवारी दुपारी एक वाजेपासून विद्यार्थी वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतील. 27 जूनला दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमध्ये गुणपत्रिका मिळेल, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली. 'बेस्ट ऑफ फाइव्ह'` या सूत्राच्य आधारावर हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बारावीचा निकाल मंडळाने तडकाफडकी जाहीर केल्यानंतर, दहावी निकालाच्या तारखेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

येथे पाहाता येईल निकाल...
www.msbshse.ac.in
www.mh-ssc.ac.in
www.maharashtratimes.com
www.studyssconline.com
www.myssc.in/sscresult
www.sscresult.mkcl.org


या शिवाय बीएसएनएलच्या मोबाइलवरूनही विद्यार्थ्यांना आपला निकाल एसएमएसद्वारे मिळवता येणार आहे. विद्यार्थ्यांनी MHSSC (space) Seat No. टाईप करून 57766 या क्रमांकावर एसएमएस केल्यास एक रुपयांत त्यांना आपला निकाल उपलब्ध होऊ शकेल.