1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: औरंगाबाद , शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (11:02 IST)

दुष्काळस्थिती: आढावा बैठकीत आश्वासनांचा कोरडा पाऊस

मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत आढावा बैठक घेतली. मराठवाड्यात  खरिपाच्या पिकांची परिस्थिती अत्यंत वाईट असताना मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ नसून केवळ शेतीचा  दुष्काळ आहे. यासाठी तातडीच्या उपाययोजनांद्वे  शेतकर्‍यांना दिलासा मिळाला पाहिजे. असे कोरडे वक्तव्य व जुन्याच घोषणांची उजळणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्तांना ठेंगा दाखवला.
 
मराठवाड्यातील 8 हजार तर विदर्भातील 9 हजार गावांची पैसेवारी 50 टक्कांपेक्षा कमी असून आज विधागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
 
महसूलमंत्री एकनाथ मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे  यांनी सादर केलेल्या अहवालाती बहुतांश शिफारशी मंत्रिमंडळाने स्वीकारल्य आहेत. केंद्राकडे मागितलेले  4500 कोटी रुपये लवकरच  मिळतील अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.