1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (10:48 IST)

महाराष्ट्रात दुष्काळ?

drought
ऑगस्ट उलटल्यानंतरही पावसाचा पत्ता नसल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. रुसलेल्या पावसाने राज्यातून उघडीप घेतली आहे. येत्या काही दिवसातही पावसाची शक्यता नसल्याने दुष्काळ अधिक तीव्र होईल, अशी शक्यता आहे.
 
कोकण आणि विदर्भात काही प्रमाणात पाऊस सुरु होता मात्र, आता तेथेही उघडीप घेतली आहे. गोंदिया येथे ६० मिलिमीटर पाऊस झाला. येत्या २४ तासात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार असले तरी कोठेही जोरदार पाऊस पडणार नाही, असे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.