शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 10 मे 2016 (11:24 IST)

रिंकूच्या वेब पेजवर सुभाष देसाई यांचा नंबर

रिंकू राजगुरूच्या वेब पेजवर सुभाष देसाई यांचा मोबाईल नंबर रिंकूचा नंबर म्हणून झळकला आहे.

त्यामुळे सुभाष देसाईंना अभिनंदनाचे हजारो फोन येऊ लागले. बरं हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं असतं तर ठीक, पण ‘सॉरी राँग नंबर आहे’ असं सांगूनदेखील देसाईंची खरी पंचाईत तेव्हा होते, जेव्हा समोरचा कॉलर त्यांना विचारतो की ‘मग तुम्ही कोण बोलताय?’  कार्यक्रमात सारखं ‘मी उद्योग मंत्री बोलतोय’ हे सांगणं सुद्धा त्यांना कठीण होऊन बसलं. हा प्रकार नजरचुकीने झाला की कोणाचा खोडसाळपणा याचा थांगपत्ता अजून लागलेला नसला, तरी योग्य ठिकाणी तक्रार करून या कॉल्सचा मी बंदोबस्त केल्याचं स्पष्टीकरण सुभाष देसाईं यांनी दिलं आहे.