मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (23:17 IST)

एसटी महामंडळाकडून तिकिटाच्या दरात 10 टक्क्याने वाढ

st buses
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर खासगी बस ने भाडे वाढवले आहे. आता एसटी महामंडळाकडून देखील एसटी बसच्या तिकिटात दर वाढ करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने तिकिटाच्या दरात 10 टक्क्याने वाढ केल्यामुळे नागरिकांच्या खिशावर बोझा वाढणार आहे. 

एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या सणाच्या वेळी तिकिटाचे दर वाढवले आहे. भाडेवाढ 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्री पासून 27 नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार. दिवाळी नंतर मूळ तिकिटाच्या दराप्रमाणे घेण्यात येईल. ऐन सणासुदीला दरवाढीचा फटका प्रवाशांना बसणार आहे. ज्यांनी आगाऊ तिकिटाचे बुकिंग केले आहे. त्यांना देखील जास्तीचे दर वाहकाला द्यावे लागणार आहे. 
 
दिवाळीच्या सणात खासगी बस देखील मनमाफिक दर प्रवाशांकडून आकारतात. आता दिवाळी हंगामाचा फायदा घेण्यासाठी एसटी महामंडळ देखील दरवर्षी भाडेवाढ करते. एसटी महामंडळाला अशा प्रकारची दरवाढ करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टी आणि दिवाळीत एसटी महामंडळ दरवाढी करते. या दरवाढीचा फटका प्रवाशांना बसणार आहे. 
 
 




Edited by - Priya Dixit