सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 मार्च 2018 (16:26 IST)

दहावीच्या विद्यार्थ्यांचा हृदयविकाराने मृत्यू

मुंबईच्या प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या ऋतिक घडशीचा गुरुवारी पहाटे अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. ऋतिकचा दहावीचा गुरुवारी पहिला पेपर होता. केईएम रुग्णालयात ऋतिकला दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

दहावीच्या पेपरची तयारी करत असतानाच गुरूवारी पहाटे अभ्यास करून झोपल्यानंतर ऋतिक उठलाच नाही. त्यानंतर पहाटे दीडच्या सुमारास ऋतिकला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ऋतिकला तातडीने मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 “ऋतिकला गुरूवारी पहाटे रुग्णायलात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.”असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अविनाश सुपे यांनी सांगितले.