शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जानेवारी 2024 (10:03 IST)

बंदी असलेला १५१ किलो वजनाचा २१० रिल नायलॉन मांजा जप्त

manja patang
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नायलॉन मांजाची विक्री आणि साठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मकर संक्रांत सणादरम्यान मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात. पतंगासाठी नायलॉन मांजाचा वापर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने कोणीही नायलॉन मांजाची खरेदी अथवा विक्री करु नये,

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने बंदी असलेला मांजा असून, ते विक्री करत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
 
महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करताना गोपाळपुरा मधील गोलु पुरन खिची याच्याकडून नायलॉन मांजाचे १०० नग रिल, सुप्रीम कॉलनी परिसरातील कृष्णा नगर मधील ब्रिजेश राजाराम तिवारी २६ नग रिल, तर सुनिता दिनेश चौधरी यांच्या कडून ८० नग रिल, रायपूर कुसुंबा येथील सर्जेराव साहेबराव पाटील याच्या कडून ४ नग रिल असे एकूण १५१ किलो वजनाचे २१० रिल जप्त केले.

दरम्यान, जप्त केलेल्या नायलॉन मांजा रिल रिसायकल करण्यासाठी मे. बियाणी पॉलिमर्स, एम.७५ एम.आय.डी.सी. जळगाव. यांचेकडेस देण्यात आला आहे.

सदर कार्यवाही सहा. आयुक्त (आरोग्य विभाग ) उदय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, जितेंद्र किरंगे, नागेश्वर लोखंडे, उल्हास इंगळे , आरोग्य निरीक्षक शुभम कुपटकर, मनोज राठोड, सुरेश भालेराव, कुणाल बारसे, चेतन हातागडे, मोकादम नंदू गायकवाड यांनी केली.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor