शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 एप्रिल 2022 (15:17 IST)

किरीट सोमय्यांची ३ तास चौकशी

Kirit Somaiya
INS Vikrant घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांना आज आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी हजार राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. त्यानंतर आज किरीट सोमय्या चौकशीसाठी हजर झाले. त्यांची तीन तास चौकशी झाली. सलग चार दिवस सोमय्या यांची चौकशी होणार आहे.
 
शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) ह्यांच्याकडून सोमय्या यांच्यावर ह्या प्रकरणात घोटाळा केल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. तर, मी कोणताही घोटाळा केलेला नाही अश्या प्रकारची वक्तव्य किरीट सोमय्या यांच्याकडून येत आहेत.

INS Vikrant ह्या भारतीय नौदलातील ऐतिहासिक अश्या लढाऊ जहाजाला लिलावापासून वाचविण्याकरिता भाजप नेते किरीट सोमय्यांनी एक मोहीम हाती घेतली. ह्या मोहिमेअंतर्गत INS Vikrant वाचविण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा केला. ह्या मोहीमेतून एकूण 58 कोटींचा निधी जमा झाला होता व तो पैसा गेला कुठे असा सवाल संजय राऊत ह्यांनी उपस्थित केला. तर, राऊतांनी दिलेला 58 कोटींचा हा आकडा खोटा असून मी कोणताही घोटाळा केलेला नाही असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.
 
ह्याच प्रकरणात चौकशीसाठी उपस्थित राहा असे सांगितले गेले असताना किरीट सोमय्या भुमिगत झाले होते. त्यावेळी, त्यांना फरार घोषित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना किरीट सोमय्या पून्हा जनतेसमोर आले. त्यामुळे आता आजपासून सुरू होणऱ्या चौकशीसाठी उपस्थित राहणे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे.