रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2017 (09:39 IST)

5 लाखांच्या नवीन बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

औरंगाबादमधून तब्बल 5 लाख रुपयांच्या नवीन बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या नोटांमध्ये शंभर, पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका प्रिंटरससह दोघांना ताब्यात घेतलं आहे. माजिद खान आणि बिसमिल्ला खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पाच लाखांच्या खोट्या नोटांसाठी तो अडीच लाख घेत होता. अशी माहिती समजते आहे. हुबेहुबे दिसणाऱ्या या खोट्या नोटा चटकन ओळखणं कठीण आहे. पोलिसांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून माजिद खान आणि बिसमिल्ला खान यांना अटक केली.