अल्पवयीन मुलीचे विनय भंग केल्या प्रकरणी शिक्षकाला महिलेने चोपले
फोटो- साभार सोशल मीडिया
कोल्हापुरात एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. शिक्षकाने मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलीने आपल्या पालकांना केल्यावर एका महिले ने आणि गावकरांनी शिक्षकाला मारहाण केली आहे. तसेच एका महिलेने शिक्षकाला दप्तराने मारहाण केली आहे. तर काही जणांनी त्याला लाथा बुक्क्याने तुडवले आहे. या शिक्षकावर एका मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र या प्रकरणाशी संबंधित तक्रार अद्याप पोलिसांकडे दाखल करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.