शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2022 (12:28 IST)

पॅराशूटचा बेल्ट तुटून 400 फुटांवरून पडून साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू

सध्या नाताळच्या सुट्ट्या सुरु आहे. हिवाळा आणि नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक लोक पर्यटनासाठी हिल स्टेशनवर जाण्याचा बेत आखतात. हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात पर्यटनासाठी साताऱ्यातून गेलेल्या तरुणाचा पॅराग्लायडिंग करताना पॅराशूटचा बेल्ट तुटून 400 फुटांवरून पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी २५ डिसेंबर रोजी घडली आहे. सुरज शहा(30) असे या मयत तरुणाचे नाव आहे. 

सुरज सातारा जिल्ह्यातील शिरवळ गावातील असून मित्रांसह नाताळाची सुट्टी घालविण्यासाठी  हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे गेला असता तिथे त्याला पॅराग्लायडिंग बघता पॅराग्लायडिंग करण्याचा मोह आवारता आला नाही, त्याने पॅराग्लायडिंग चालकासह झेप घेतली. पॅराशूटचा बेल्ट 400 फुटावर असताना तुटला आणि चालकासह तो खाली कोसळला. सूरजला खाली कोसळताना पाहून त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असताना तो सफरचंदाचा बागेत जखमी अवस्थेत आढळला. त्याला मित्रांनी तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला. त्याचा निधनाची माहिती मिळतातच त्याचा घरी आणि शिरवळात शोककळा पसरली आहे. त्याचे पार्थिव त्याचा घरी पाण्यात आले असून त्याच्यावर आज अंत्यसंस्कार केले जातील. 
 
Edited By- Priya Dixit