शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (07:36 IST)

अल्पवयीन मुलीवर बापाकडून सात वर्षे अत्याचार; न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या बापाला जिल्हा न्यायालयाने दोषी धरून 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
अहमदनगर शहरातील एका उपनगरातील हा आरोपी आहे. जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी सरकारी वकील म्हणुन अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले.
फिर्यादी अल्पवयीन मुलगी बापासह तिच्या लहान भावासोबत राहत होती. तिची आई त्यांच्यासोबत राहत नव्हती. त्यामुळे पिडीत मुलगी ही घरातील सर्व घरगुती काम करून शालेय शिक्षण घेत होती.
तिचे आजी-आजोबा हे त्यांच्या घराशेजारीच राहत होते. फिर्याद देण्याच्या सात वर्ष आगोदरपासुन तिचा बाप तिच्यावर शारिरीक अत्याचार करत होता.
त्यावरून पिडीत मुलीची आई व बापामध्ये वाद झाले होते. त्यामुळे पिडीत मुलीची आई ही पिडीत मुलीला घेवुन औरंगाबाद येथे निघुन गेली होती. तेव्हा तिच्या बापाने त्यांचा शोध घेवुन पिडीत मुलगी व भावास घरी अहमदनगर येथील घरी आणले होते.
 
त्यानंतर आरोपी हा पिडीत मुलीवर नैसर्गिक तसेच अनैसर्गिक शारिरीक अत्याचार करत असे. 20 मार्च 2019 रोजी तिच्या बापाने पिडीत मुलीवर अनैसर्गिक, शारिरीक अत्याचार केला. त्यामुळे पिडीतेला शारिरीक त्रास झाला. पिडीत मुलीने पोलिसांना फोन करून सर्व हकिकत सांगितली.
 
सदर घटनेबाबत पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अनैसर्गिक अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक आर. आर. पांढरे यांनी करून न्यायालयात आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण 07 साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यामध्ये पिडीत मुलगी, पंच साक्षीदार, तपासी अंमलदार, वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदर खटल्याचे सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी नंदा गोडे, उत्कर्षा राठोड यांची मदत झाली.
सरकारी वकील अ‍ॅड. केळगंद्रे-शिंदे यांनी त्यांच्या युक्तिवादादरम्यान न्यायालयासमोर सांगितले की, सदरचा गुन्हा हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे. लहान मुल हे मोठ्या विश्वासाने आपल्या पालकांकडे संरक्षणाची आस लावुन असतात.
परंतु या खटल्यामध्ये कुंपनानेच शेत खाल्ल्याचे सिध्द होते. सदर घटनेमुळे लहान मुलांच्या मनातील नात्यावरील विश्वासास तडा जावुन त्यांच्या मनात कायमस्वरूपी असुरक्षितेची भावना वाढीस लागते.
त्याचा त्यांच्या बालमनावर मोठा विपरीत परिणाम होवुन त्यांच्या भविष्य धोक्यात येते. सदरचा युक्तिवाद ग्राह्या धरून न्यायालयाने आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.