शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (10:46 IST)

अपघाती मृत्यू :बंधाऱ्यात कार कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी उघडली आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी लोक जात आहे. एका कुटुंबीयांनी देखील देवीच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. पण काळाने त्या कुटुंबावर झडप घातली आणि कुलदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या या कुटुंबाची कार बंधाऱ्यात कोसळल्याने सासू-सासरे आणि सुनेचा नाका-तोंडात पाणी शिरल्याने दुर्देवी अंत झाला. 
 
ही घटना आहे औरंगाबादच्या सैलूद रहिवासी चौधरी कुटुंबाची आई एकलहरा देवी चे दर्शनासाठी जाणाऱ्या चौधरी कुटुंबावर काळाने झडप घातली आणि त्यांची कार बंधाऱ्यात कोसळली या बंधाऱ्याला कोणतेही उपाय योजना नव्हती त्या मुळे कारचालक वैजनाथ यांचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार 30 ते 40 फूट खोल पाण्याच्या बंधाऱ्यात कोसळल्यामुळे सासू सासरे आणि सुनेचा मृत्यू झाला.अशा परिस्थितीत अपघाताची माहिती वैजनाथ यांनी आपल्या कुटुंबियांना दिली नंतर त्यांचा मोबाईल बंद झाला.
 
वैजिनाथ उमाजी चौधरी(52), मंगल वैजिनाथ चौधरी(45), आणि सुकन्या मधुर चौधरी(22) असे मयत झालेल्यांची नावे आहेत. गावकऱ्यांनी आणि अग्निशमनादलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तासाने ही कार बंधाऱ्यातून बाहेर काढली.कार बंधाऱ्यातून काढण्यासाठी जवानांना खूप परिश्रम करावे लागले.