शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 जुलै 2024 (17:41 IST)

एमएलसी निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई होणार!

nana patole
नुकत्याच महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांवर निवडणुका झाल्या. त्यापैकी 9 जागांवर सत्ताधारी पक्ष जिंकून आले. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय आघडीत समावेश केलेल्या 5 आमदार आणि काही लहान पक्षांचे क्रॉस व्होटिंग करणे आहे. त्यामुळे एनडीए ने एक जागा अतिरिक्त जिंकली. 

या निवडणुकीत भाजपचे पाच, शिंदे गटातील शिवसेनेचे 2 आणि NCP अजित पवार गटातील 2 सदस्य विजयी झाले. तर उद्धव ठाकरे गट 1,काँग्रेस ने 1 जागा जिंकली. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ने तीन उमेदवार उभे केले होते. त्यापैकी दोघांना विजय मिळाली. 

या पराभवाचे कारण क्रॉस व्होटिंग आहे. एमएलसी निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या बंडखोर काँग्रेसच्या आमदारांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची तयारी सुरु झाली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. 

प्रदेशच्या काँग्रेसच्या प्रभारींनी स्थानिक नेतृत्वाशी बोलून या बाबत माहिती घेतली असून दिल्लीतील संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्याकडे सोपवली.सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीत आहे. 
आता क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी दिल्ली परत आल्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
 
 Edited by - Priya Dixit