रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भुजबळांनी अभिवादन केल्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाईंच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

वाई(सातारा) : नायगाव (ता. खंडाळा) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना छगन भुजबळ व रूपालीताई चाकणकर यांनी अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. महाराष्ट्र सदनात छगन भुजबळ यांनी घोटाळा केला आहे. त्यांचा हात पवित्र स्मृतीस लागला म्हणून राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) आंदोलन करण्यात आले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे औद्योगिक सेलचे अध्यक्ष बंडू ढमाळ व इतर कार्यकर्त्यांनी पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. यावेळी उपस्थित महिलांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. “जग कुठे चालले आहे आणि तुम्ही कुठे चालला आहात”, असे म्हणून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही बळाचा वापर करून कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला.