शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जानेवारी 2020 (11:20 IST)

1700 किमीचा प्रवास करून वाघोबा आता बुलडाणा मुक्कामी

गेल्या अनेक दिवसांपासून वृत्तपत्रांच्या बातम्यांचा मथळा बनलेला 'T1C1' वाघ आता बुलडाण्यातल्या ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात मुक्कामी राहण्याची शक्यता आहे.
 
सुमारे 1700 किलोमीटरचा प्रवास केल्यानं तीन वर्षांचा 'T1C1' वाघ चर्चेत आला होता. या वाघाच्या हालचालीवर जवळपास 11 महिने रेडिओ कॉलरद्वारे नजर ठेवण्यात आली होती.
 
दिल्ली ते मुंबई असा 1416 किलोमीटरचा प्रवास 190 दिवसात या वाघानं केला होता. हा प्रवास भारतातील एखाद्या वाघानं पहिल्यांदाच केला होता.
 
'T1C1' वाघ मूळचा यवतमाळमधील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातला आहे. 26 जून 2019 रोजी त्यानं अभयारण्य सोडलं आणि त्यानंतर 1700 किमीचा प्रवास त्यानं केलं. आठ जिल्हे आणि चार वन्यजीव अभयारण्य हा वाघ फिरला.