शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई प्रतिनिधी , शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (08:10 IST)

अजित पवार गट लागला लोकसभेच्या तयारीला, नेते करणार राज्याचा दौरा

ajit panwar
Ajit Pawar group starts preparations  : राष्ट्रवादीतील दोन गटांतील आरोप-प्रत्यारोपांची आतषबाजी बंद झाली असली तरी पक्षावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी सुप्त संघर्ष सुरूच आहे. लोकसभा व पाठोपाठ येणार विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांमध्ये पक्षाची बांधणी करण्याचे अजित पवार गटाने ठरवले असून प्रमुख नेते लवकरच लोकसभा मतदारसंघनिहाय राज्याचा दौरा करणार आहेत.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्या नंतर पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुढील काळात कोणकोणते कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत याची माहिती दिली. या बैठकीत पक्षाची ध्येयधोरणे, राज्यव्यापी संघटन यावर चर्चा केली. पुढच्या आठवड्यात कोअर ग्रुपची बैठक होणार आहे. पक्षाचा कालबद्ध कार्यक्रम ठरवणार आहोत. मी स्वत: राज्याच्या दौ-यावर जाणार आहे. राज्यात ९ मंत्री आहेत. त्यांचा जनता दरबार अ ५ बंगल्यावर सुरू केला जाणार असल्याचे तटकरे म्हणाले.