रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2023 (21:17 IST)

अजित पवारांचा शरद पवारांना पहिला धक्का! ‘हे’ आहे अजित पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष

ajit panwar sharad panwar
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यानंतर आता पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी अजित पवारांनी सुरुवात केली आहे.
 
सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. थोड्याच वेळात अजित पवार या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. देवगिरीवर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात अजित पवार या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. अजित पवार हे अधिकृत पत्र काढून त्याबाबत घोषणा करतील, असं सांगण्यात येतंय.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor