शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अक्षय कुमार शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेणार

राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एका गावामधील शेतकर्‍यांवर बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार मायेची फुकंर घालणार आहे.
 
यासाठी, अक्षयने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आणि या भागाला मदत करण्याची इच्छा अक्षयने व्यक्त केली.  तेव्हा मुनगंटीवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याबाबत सुचवले.
 
यवतमाळ जिल्‍ह्‍यातील ज्या गावात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत त्या गावांचा अभ्यास करुन सरकार प्रस्ताव देणार आहे. अक्षयने यापूर्वीही मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ९० लाखांची मदत  केली होती. 
 
अक्षयचा हा दिलदारपणा कौतुकास्‍पदच आहे. आत्‍महत्‍याग्रस्‍त गाव दत्‍तक घेतल्‍यानंतर अक्षय या गावतील शेतकऱ्यांना मदत करणार आहे.