मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (22:14 IST)

हनीट्रॅप प्रकरणात आणखी एका आरोपीस अटक ! आलिशान फॉर्च्युनरही जप्त…

अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणामध्ये आत्तापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामध्ये आता बापू सोनवणे या आरोपीस अटक केलीय, धक्कादायक म्हणजे बापू सोनवणे याच्यावर नगर शहरातील कोतवाली, पारनेर यासह विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
 
बापू सोनवणे याने त्या महिलेची साथ देऊन इतरांना फसविण्याचा प्रकार केला आहे. हे तपासामध्ये उघड झाल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी बापू सोनवणे याला त्याच्या घरातून अटक केली आहे. तसेच त्याची चारचाकी फॉर्च्युनर गाडी सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे.
 
सादर गुन्हयातील आरोपी महिलेच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असून, या ठिकाणी काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. तसेच काही बँकेचे कागदपत्र सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
 
तसेच तिच्याकडे असलेल्या मोबाईल वरून तिने आतापर्यंत कोणाकोणाला कशा कशा पद्धतीने संपर्क केला, तसेच तिच्याकडे कोणकोणते व्हिडिओ आहे याचा पोलिसांनी आता शोध सुरू केलेला आहे. विशेष म्हणजे संबंधित महिलेकडे दोन मोबाईल असून ते पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
 
या प्रकरणामध्ये बापू सोनवणे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडून अन्य माहिती सुद्धा आता पोलिसांना मिळणार आहे. त्याची फॉर्च्युनर गाडी पोलिसांनी हस्तगत केली असून, त्यामुळे पोलिसांनी आता त्याचे कोण कोण साथीदार आहेत याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.