शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मे 2022 (08:06 IST)

माफी मांगो राज ठाकरे...भोजपुरी गाण्यानं घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

raj thackeray
राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या सभेतून सुरु केलेल्या या इनिंगनंतर ठाणे, पुणे,औरंगाबादमध्ये झालेल्या सभा आणि कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी अस्मितेचा मुद्दा बाजुला सारत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन नव्यानं मैदानात उतरलेल्या राज ठाकरेंना आता अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृज भुषण सिंह वारंवार आव्हान देत आहेत. यावरुनच आता एक भोजपुरी गाणं देखील तयार करण्यात आलंय. (Mafi Mango Raj Thackeray Song)
 
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आता भोजपुरी गाण्यातून सुद्धा आव्हान देण्यात आलं आहे. भाजप खासदार बृज भुषण सिंहांनी दिलेल्या आव्हानंतर आता या गाण्यातून देखील त्यांना आव्हान देण्यात आलं आहे. तर तिकडे बृज भुषण सिंह यांनी आता 'राज ठाकरेंनी आता माफी मागितली तरी त्यांना 5 जूनला अयोध्येत प्रवेश नाही' असं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.