शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (12:36 IST)

घरातून बाहेर काढलेल्यांवर मी बोलत नाही; अकबरुद्दीन यांची राज ठाकरेंवर टीका

akbaruddin ovci
AIMIM नेते अकबरुद्दीन ओवैसी आज औरंगाबादमध्ये  होते. एका कार्यक्रमात बोलता असताना अकबरुद्दीन ओवैसी  यांनी आक्रमक होत जे कुत्रे भुंकत आहेत, त्यांना भुंकू द्या असं म्हणत राज ठाकरेंवर टीका केली. ते लोक तुम्हाला अडकवण्यासाठी जाळं टाकत आहेत, त्यांच्या जाळ्यात तुम्ही अडकू नका. त्यांचं बोलणं ऐका, हसा आणि निघून जा. तुमची लायकी नाही की मी तुमच्यावर बोलावं. माझे खासदार तरी आहेत, तुम्हाला तर घरातून बाहेर काढलं आहे असं म्हणत त्यांनी बोचरी टीका केली.
 
"एकाच धर्माच्या प्रगतीने देश महासत्ता होईल असा विचार करणारे मूर्ख"
अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, कोणताही देश तोपर्यंत विकसीत होत नाही, जोपर्यंत तिथल्या प्रत्येक नागरिकाला तो देश आपला वाटत नाही. आपण आज या शाळेच्या भुमिपुजनाच्या माध्यमातून मी मुस्लीम विद्यार्थ्यांना देशाच्या जडनघडणीतला एक महत्वाचा भाग बनवायला आलो आहे. यावेळी ते पुढे असेही म्हणाले की, कोणी मुर्ख जर असा विचार करत असेल की, कुणा एकाच्या विकासानं हा देश महासत्ता होईल, तर ते मुर्ख आहेत. आम्ही आमचा हा विचार घेऊन पुढे जातो आहोत. शिक्षणाच्या बाबतीत मुस्लीम मागे आहेत हे मान्य करावं लागेल. ही शिक्षण संस्था जरी मुस्लीम वस्तीत असेल तरी, इथे कुणी हिंदुंसाठीही आमच्या या शाळेचे दरवाजे उघडे असतील असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले. तुमच्या मनात तरी आमच्याबद्द द्वेष असेल तरी आमचं मन मोठं आहे असं अकबरुद्दीन म्हणाले. आमचं मन कायम मोठं होतं, त्यामुळे जग अकबर आणि बाबरची आठवण करतं.