आदेश येताच पक्ष कार्यालये ताब्यात घेणार
लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेले आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.
यासोबत चिन्हही अजित पवार गटाकडे गेले आहे. पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर आता लवकरच पक्ष कार्यालयेही शरद पवार गटाच्या ताब्यातून निसटणार आहेत. लवकरच अजित पवार गटाकडून पक्ष कार्यालयेही ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ पातळीवरून आदेश येताच लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राष्ट्रवादी पक्ष कार्यालये ताब्यात घेण्याबाबत अजून आदेश नाहीत. वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की, लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ.