रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मे 2022 (15:05 IST)

सुरगाणा- खैराच्या लाकडाची तष्करी रोखण्यासाठी गेलेल्या चार वनकर्मचा-यांवर हल्ला

smuggling of Khaira
खैराच्या लाकडाची तष्करी रोखण्यासाठी गेलेल्या चार वनकर्मचा-यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात चारही वनकर्मचारी जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. उंबरठाण या पूर्व वनविभागाच्या वनपरिक्षेत्रातील उंबरपाडा येथे हा हल्ला करण्यात आाला. रामजी मधुकर कुवर (२९ रा. केळीपाडा ता.सुरगाणा),अक्षय पुंडलीक पाडवी (२६),हिरामण काशिनाथ थविल (२६) व जजीराम मोतीराम शेवरे (३० रा. तिघे उंबरठाण ता.सुरगाणा) अशी जखमी कर्मचा-यांची नावे आहेत.
 
खैराच्या लाकडाची तष्करी होत असल्याची माहिती वनकर्मचा-यांना मिळाल्यानंतर हे कर्मचारी जंगलात शिरले. वाहनाचा मागोवा घेत त्यांनी खैराच्या लाकडाने भेरलेला ट्रॅक्टर अडवला व चालकास ताब्यात घेतले. यावेळी ट्रॉलीत बसलेल्या मजूर मात्र पळून गेले. या चालकास उंबरठाण येथे घेऊन जात असतांना धुम ठोकलेल्या मजूरांनी शेजारच्या गावातील नागरीकांना सोबत आणून कर्मचा-यांवर दगडफेक केली. या घटनेत मोठ्या जमावाने दगडफेक केल्याने चारही कर्मचारी जखमी झाले. अतिदुर्गम भाग असल्यामुळे सुरगाणा वनपरिक्षेत्रातील अतिरिक्त कुमक तसेच पेठमधील कर्मचा-यांची फौजफाटा येईपर्यंत चौघे वनरक्षक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. जखमींना तात्काळ सुरगाणा उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्या प्रकृर्तीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. वनविभागाचा फौजफाटा घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच हल्लेखोर मुद्देमाल सोडून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली.