शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (08:23 IST)

सुरगाणा येथे भीषण अपघात, काका- पुतण्याचा जागीच मृत्यू

सुरगाणा शहराजवळील सुर्यगड गावालगत भीषण अपघातात एकाच दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी  सायंकाळी  (एमएच 1५ एफव्ही ०२४१) हा आयसर टेम्पो सुरगाणा येथून उंबरठाण कडे जात असतांनाच सूर्यगड गावाजवळील उतारावर उंबरठाण कडून येणा-या दुचाकीला (एमएच १५ बीएस ६६७५) जोरदार धडक बसल्याने दुचाकी वरील तिघेजण जागीच ठार झाले.
 
दरम्यान संततधार पाऊस सुरु असतांनाच रस्त्यावर दाट धुक्यामुळे ही दुर्घटना झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात गणेश डंबाळे (२४), सोमनाथ पवार (४२), अश्विन पवार (१४) हे तिघेजण जागीच ठार झाले. अश्विन हा अलंगुण येथील आश्रम शाळेत शिकत होता. त्याची तब्येत बिघडली असल्याने उपचारासाठी त्यास आणण्यासाठी गेले होते. दरम्यान अपघातानंतर टेम्पो चालक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सुरगाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.