शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (12:40 IST)

जळगावमध्ये 1500 किलो गांजा जप्त

मुंबई- राज्यात सध्या ड्रग्ज विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात असताना मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगावात एक मोठी कारवाई करत तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. एनसीबीच्या पथाकाने यावेळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.
 
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रतील जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ एनसीबीच्या पथकाने तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एनसीबीने दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला जात होता.