शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (08:52 IST)

प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज निर्मितीसह विक्री व वापरास बंदी

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन समारंभाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून, आजपासून 31 जानेवारी 2022 पर्यंत प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करणे यावर बंदी  घालण्यात येत आहे. फौजदारी  प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144 (1) (2) अन्वये प्राप्त अधिकारान्वये जिल्ह्यात माननीय पोलीस आयुक्त यांची हद्द वगळून संपुर्ण नाशिक (ग्रामीण) परिक्षेत्रात बंदी घालण्यात येत असल्याचे शासकीय आदेश अपर जिल्हादंडाधिकारी  नाशिक भागवत डोईफोडे यांनी जारी केले आहेत.
आदेशात नमूद केल्यानुसार, दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन समारंभ राज्यभर साजरा करण्यात येतो. रा
ष्ट्रध्वजाचा आदर करणे हे प्रत्येक नगारिकाचे आद्य कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा यासंदर्भात शासनाने  सुचना निर्गमित केल्या आहेत. राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विशेष कला-क्रिडा प्रसंगी वैयक्तीकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्तत: टाकले जातात, हे दृष्य राष्ट्रप्रतिष्ठेला शोभनारे नसल्याने शासनाच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टीकच्या वापरास मान्यता दिलेली नाही. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोध चिन्हे व नांवे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम क्र 69/1971 व क्र 51/2005 तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध असल्याचेही आदेशित केले आहे.
सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) नुसार एकतर्फी  आदेश काढण्यात आला असल्याचे  अपर जिल्हादंडाधिकारी  नाशिक भागवत डोईफोडे यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.