भाजपकडून 'एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर'

Last Modified बुधवार, 22 जून 2022 (22:47 IST)
भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेना आमदार आणि भाजपमध्ये या संदर्भात वाटाघाटी सुरु आहे या वर एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेला मुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक वरील संवादानंतर ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट मंडळी आहे. आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडणं का गरजेचं आहे, हे स्पष्ट केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिलेला प्रस्ताव फेटाळून पुन्हा परत न येण्याची भूमिका मंडळी आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून 4 मागण्या मांडल्या आहेत.
1.गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला.
2.घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.

3.पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.

4.महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

तर शिवसेनेकडे केलेल्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही भाजपबरोबर सरकार बनवायला तयार आहोत, असं सूत्रांनी सांगितलं आहे. भाजपची मंडळ एकनाथ शिंदेंच्या सतत संपर्कात आहे असल्याचं सूत्रांनी मान्य केलं आहे.
गुवाहाटीतून एकनाथ शिंदे यांचा बुधवारी सकाळी उद्धव ठाकरेंशी संपर्क झाला आहे. तूर्तास तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. पण आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नाही, असं शिंदेंच्या गटातून सांगण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरेंना भेटायला जाण्याचा निर्णय सगळ्या आमदारांचा असेल. सगळे एकत्र येऊन निर्णय घेतील उद्धव ठाकरे यांना भेटायचं की नाही,

एकनाथ शिंदे यांनी वेळेवेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या व्यथा मांडल्या होत्या पण त्यावर काहीच तोडगा काढण्यात आला नाही, म्हणू एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचलल्याचं त्यांच्या निकटवर्तींयांचं म्हणणं आहे.
ग्रामीण भागात शिवसेना खूपच कमकुवत आहे, शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाहीये. सरकराच्या कामांच श्रेय मिळत नाहीये, यामुळे आमदारांमध्ये खदखद आहे. जी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली होती, पण त्यातून पुढे काहीच निष्पन्न झालं नाही,


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

चंद्रकांत पाटील यांनी केली महत्वाची 'ही' घोषणा

चंद्रकांत पाटील यांनी केली महत्वाची 'ही' घोषणा
एमपीएससी आणि सीईटी या परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थींसमोर पेच निर्माण झाला ...

Used Mobile Phone: सेकंड हँड फोन खरेदी करताना या 5 गोष्टी ...

Used Mobile Phone: सेकंड हँड फोन खरेदी करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा
Second Hand Mobile Phone Complete Test: जर तुम्ही वापरलेला मोबाईल फोन विकत घेत असाल तर ...

US OPEN:लसीकरण न केल्यामुळे जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर

US OPEN:लसीकरण न केल्यामुळे जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर
टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविचने पुढील आठवड्यात सिनसिनाटी येथे सुरू होणाऱ्या हार्ड कोर्ट ...

भाजपचे नवे संसदीय मंडळ जाहीर : शिवराज आणि गडकरी बाहेर, ...

भाजपचे नवे संसदीय मंडळ जाहीर : शिवराज आणि गडकरी बाहेर, येडियुरप्पा आणि या नेत्यांची निवड
भारतीय जनता पक्षाने नवीन संसदीय मंडळाची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठ नेते ...

Kevin O’Brien Retirement: विश्वचषकात सर्वात वेगवान शतक ...

Kevin O’Brien Retirement: विश्वचषकात सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या खेळाडूची निवृत्ती
आयर्लंडचा स्फोटक फलंदाज केविन ओब्रायनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ...