शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (16:17 IST)

जरे यांच्या हत्येसाठी बोठेनी 12 लाखांची सुपारी दिली होती

अहमदनगरच्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या घर झडतीत पोलिसांनी आयपॅड जप्त केला होता. त्याचेही लॉक उघडत नसल्याने आयपॅडची फॉरेन्सिक लॅबमार्फत तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून, लवकरच आयपॅड तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे याला पोलिसांनी हैद्राबाद येथून ताब्यात घेतले आहे.बोठे याची रवानगी सध्या पोलीस कोठडीत आहे. 
 
यापूर्वी पोलिसांनी बोठेचा मोबाईल, पंटर तनपुरेचे सात मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. आता आयपॅडची तपासणी फॉरेन्सिकमार्फत केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी सागर भिंगारदिवे याला दिली होती. ही सुपारी 12 लाखाची असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
 
पैशाचा व्यवहार कशा पद्धतीने झाला याचा सुद्धा तपास अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार्‍या वस्तूचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार आहेत.