बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (15:37 IST)

तसंच आता होऊ देऊ नका म्हणत चंद्रकांत पाटील यांचा टोला

राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांच्याबाबतीतही सुरुवातीला आरोप फेटाळले नंतर त्यांचा आवाज क्षीण झाला,  आणि आता अनिल देशमुख कोण असा प्रश्न ते आपापसात विचारत आहेत. तसंच आता होऊ देऊ नका, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
 
छगन भुजबळ बिचारे दोन वर्ष आतमध्ये होते, आता अनिल देशमुख आतमध्ये आहेत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय, यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले कर नाही त्याला डर कशाला, ईडीची चौकशी आली तर घाबरता कशाला, त्यांनी चौकशीला सामोरं जावं, त्यांचा दोष नसेल तर न्यायालय  त्यांच्या बाजने निर्णय देईल, तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पाहिजेत, तुम्ही न्यायालयात एकही केस जिंकू शकलेले नाहीत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.